लोहारा : वाशी येथे बिस्किटातून विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा लक्षात घेत, लोहारा तालुक्यात शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारी अचानक शाळांना भेटी दऊन शालेय पोषण आहाराची तपाणी केली. यावेळी २३ पैकी ३ शाळांमध्ये त्रुटी आढळूून आल्या. त्यामुळे या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहेत.वाशी येथे बिस्कीटातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. असा प्रकार लोहारा तालुक्यातील कुठल्याही शाळेत घडू नये आणि खबरदारीचा एक भाग म्हणून लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी गठित केलेल्या पथकाने शनिवारी शाळांना अचानक भेटी देवून पोषण आहाराची तपासणी केली. आहार किचन शेडमध्ये शिजविला जातो का? ठरलेला मेनो दररोज दिला जातो का? आदी बाबी तपासण्यात आल्या. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विशेष साधन व्यक्ती यांच्यामार्फत २६ जुलै रोजी १३ अधिकाऱ्यांनी २३ शाळांना भेटी दिल्या. यात शालेय पोषण आहार किचनमध्ये शिजविला जातो. स्वच्छता राखली जाते हे निदर्शनास आले. पण आरणी व अचलेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाणी नाही. त्यामुळे येथे ताटाचा वापर करण्यात येत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तर भातागळी जिल्हा परिषद प्रशोत चालू वर्षाचे शालेय पोषण आहाराचे रेकॉर्डच ठेवले नसल्याचीही बाब समोर आली आहे. यामुळे या तिन्ही शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गट शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांनी सांगितले. (वार्ताहर)तर कारवाईचा बडगा शालेय पोषण आहारासंदर्भात १५ दिवसाला अचानक शाळा भेटी देण्याचा कार्यक्रम आम्ही तयार केला असून, यात काही कुचराईपणा जर आढळून आला तर त्या शाळेतील मुख्याध्यापकांवर कारवाई करणार असल्याचेही कुंभार यांनी सांगितले.
तीन शाळांमध्ये आढळल्या त्रुटी !
By admin | Updated: July 27, 2014 01:14 IST