शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:32 IST

जालना : गत काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

जालना : गत काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दिसून येते. यंदा पडलेल्या पावसामुळे थंडीचे प्रमाणही जास्त होते. पारा ८ ते ९ अंशांवर घसरला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असली तरी सकाळचे तापमान अद्यापही घसरलेलेच आहे. थंडीचा पारा १५ ते १६ अंशांवर आहे. रविवारी सकाळी तापमान १६ अंश तर दुपारी उन्हाचा पारा ३४ अंशांवर होता.त्यामुळे लहान बालके तसेच वयोवृद्धांमध्ये सर्दी, ताप, जुलाब, डोकेदु:खी आदी प्रकार वाढले आहेत. खाजगी सोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयातही अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज हजार ते बाराशे रुग्णांची तपासणी व औषधोपचार होतात. आठवड्यापासून त्यापैकी दोनशे ते अडीचशे रुग्ण सर्दी, तापाचे असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी राठोर यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळेच हे रुग्ण वाढत असल्याचे ते म्हणाले.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येते. कडक उन्हामुळे दुपारी तसेच रात्री उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च हिट फेब्रु्रवारी महिन्यातच जाणवत असल्याचे चित्र आहे. यंदा जोरदार पावसामुळे उन्हाची तीव्रताही वाढेल असे जाणकार सांगतात.ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत असली तरी प्राथमिक आरोय केंद्रात सुविधा मिळत नसल्याने बहुतांश ग्रामस्थ तसेच रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी अथवा औषधी नसते. याचा नाहक त्रास रुग्णांना सोसावा लागतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)