शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला उद्योजकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:42 IST

वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे औद्योगिकनगरी व बजाजनगरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे.

गतवर्षी एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने इंदूरच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीमार्फत वाळूज एमआयडीसीतील पी.१८३ या भूखंडावर बीओटी तत्वावर बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कंपनीला ३ हेक्टर १८ गुंठे जमिन उपलब्ध करुन देण्यात आली. महिंद्रा कंपनीकडून १६ कोटी ७० लाख रुपये खर्च करुन हा अद्यावत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

आठवडाभरापूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे, कार्यकारी अभियंता भुषण हर्षे, सहायक अभियंता सुधीर सुत्रावे, उद्योजक तथा एमईसीसीचे संस्थापक अध्यक्ष बी.एस.खोसे, मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, ए.के.सेनगुप्ता, प्रितीश चर्टजी, एन.श्रीराम, अशोक काळे, रविंद्र कोंडेकर, एस.जी.मुंदडा, अंकुश लामतुरे, विजय साळवे, आर.एन.कुलकर्णी, वसंत वाघमारे, अजय गांधी आदींच्या शिष्टमंडळाने या प्रकल्पाला मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महिंद्रा कंपनीचे सुंदर बाबु यांनी स्लाईड शोद्वारे या प्रकल्पाविषयी माहिती देऊन उद्योजकांच्या शंकाचे निरसन केले. प्रकल्पात कचºयापासून खत व सीएनजी गॅस निर्मिती करुन रास्त दरात त्याची विक्री केली जाणार असल्याचे कंपनीचे सुंदर बाबू यांनी सांगितले.

५० टन कचºयावर प्रक्रियाया प्रकल्पात दररोज परिसरातील ३१ टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट कंपनीला दिले होते. मात्र, कंपनीकडून दररोज ४५ ते ५० टन कचºयावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या दररोज ७ ते ८ टन कचºयावर प्रक्रिया करुन बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. पुढील महिन्यात पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून या प्रकल्पामुळे जवळपास ५० जणांना रोजगार मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी