शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या प्रवेशद्वारात तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 00:12 IST

बीड : जुन्या भांडणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तारखेसाठी न्यायालयात उपस्थित राहून बाहेर पडताना रमेश राठोड या तरुणावर १५ जणांनी प्राणघातक हल्ला चढविला.

बीड : जुन्या भांडणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तारखेसाठी न्यायालयात उपस्थित राहून बाहेर पडताना रमेश दलू राठोड (रा. अंथरवणपिंप्री ता. बीड, हमु. एनके कॉलनी, बीड) या तरुणावर १५ जणांनी प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली. या हल्ल्यावेळी लाठ्या- काठ्या, दगड व धारदार शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला. हल्लेखोर पसार झाले असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, रमेश राठोड हे ठेकेदार असून तीन वर्षांपूर्वी पेठ बीड भागात त्यांचा प्रशांत जाधव व इतरांशी वाद झाला होता. त्याचे पर्यवसान दोन गटातील तुंबळ हाणामारीत झाले होते. तेव्हा पेठ बीड पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण आता जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी न्यायालयात या प्रकरणाची तारीख होती. त्यासाठी रमेश राठोड हे न्यायालयात आले होते. तेथील काम आटोपून ते दुपारी तीन वाजता न्यायालयाच्या बाहेर येत होते. ते प्रवेशद्वाराजवळ येताच कारमधून व दुचाकीवरुन आलेल्या १३ ते १५ जणांनी त्यांच्यावर दगडांचा बेछूट वर्षाव सुरु केला. त्यानंतर त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. ते जायबंदी होऊन जागीच कोसळले. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. यात ते रक्तबंबाळ झाले. दरम्यान, न्यायालय चौकीतील दोन कर्मचारी तेथे येईपर्यंत हल्लेखोर आपल्या वाहनांसह तेथून अहमदनगर रोडमार्गे पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश राठोड यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. या घटनेनंतर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर मोठा जमाव जमला. शिवाजीनगर पोलिसांनी ही गर्दी पांगवली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत जाधव, अमोल जाधव, परशुराम गायकवाड नीलेश जाधव आदींची नावे समोर आली असून इतरांच्या बाबतीतही माहिती घेणे सुरु आहे. हल्लेखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)