शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: September 1, 2014 00:24 IST

नांदेड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मघा नक्षत्रापासून गती घेतली.

नांदेड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मघा नक्षत्रापासून गती घेतली. आठवडाभरापासून सातत्याने पाऊस होत असल्याने जिल्ह्यात अडीचशे मिमीचा टप्पा ओलांडला. शनिवारपासून पूर्वाचा प्रारंभ झाला़ त्यानंतर रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला़ गतवर्षीपेक्षा दुपटीने पाऊस कमी असला तरी विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे़ मृग, आर्द्रा कोरड्या गेल्यानंतर पुनर्वसूच्या शेवटच्या टप्प्यात मान्सूनचे आगमन झाले. तोपर्यंत पेरणीला दीड महिन्याचा उशीर झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नव्हते. पुष्य नक्षत्राच्या अर्ध्यानंतर पाऊस गायब झाला होता. अपेक्षा असतानाही आश्लेषा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम राहिला. पंधरवड्याचा खंड पडल्याने पिकांना बाधा पोहोचली. वाढ खुंटली, रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता पाऊस पडतो की नाही, अशी स्थिती उद्भवली. १६ आॅगस्ट रोजी मघा निघाल्या. पहिला आठवडा कोरडा गेला़ पोळ्यापासून पावसाचे आगमन झाले. शनिवारी पूर्वा नक्षत्रास सुरूवात झाली. दोन महिन्यांत जेवढा पाऊस झाला तेवढा पाऊस या नक्षत्रात पडला. त्यामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. पिके खुलली, हिरवी पडली. शेतकऱ्यांच्याही जिवात जीव आला. मघाने उत्पादकांना दिलास दिला, पिकांना वरदान मिळाले. सर्वत्र पिके वाढीस लागली. चाराटंचाई दूर झाली. पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली; परंतु जनावरांच्या पाण्याचा प्रश्न संपलेला नाही. बहुसंख्य ओढे, नाले कोरडे असल्याने नद्यांना पाणी आलेले नाही. परभणी जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पाणी आले आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पिण्यासाठी पाण्याची सोय झाली असून टंचाईचे संकट दूर झाले आहे़ (प्रतिनिधी)तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी नांदेड - ४३़६२ मि़ मी़, मुदखेड - ३८़६७, अर्धापूर - ३४़३३, भोकर - ३०़७५, उमरी- २५, कंधार - ४८़५०, लोहा - ७९, किनवट ४५़८५, माहूर - ३५़ ७५, हदगाव - ३५़ १५, हिमायतनगर- ५१़६७, देगलूर - १३, बिलोली - २४़४०, धर्माबाद - १३, नायगाव - ५२़ २० आणि मुखेड तालुक्यात ४५़१५ मि़ मी़ पावसाची नोंद करण्यात आली़