लातूर : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १२ नंबर पाटी येथील प्रशिक्षण केंद्रात १७२ जवानांचे ४४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, या जवानांना दीक्षांत सोहळ्यात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. लातूर येथील या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत ४४०९ जवानांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. देशातील वेगवेगळ्या भागांत त्यांना देशसेवेसाठी तैनात करण्यात आले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक सुनीलकुमार पार्थ यांच्या उपस्थितीत दीक्षांत सोहळा झाला. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.एन. सिंह, रवि गोपाल वर्मा यांची उपस्थिती होती. दीक्षांत सोहळ्यात जवानांना शपथ देण्यात आली. प्रशिक्षण कालावधीत जवानांना जंगल लढाई, रायफल, मॉर्टर, पिस्टल, एके ४७ याबाबतचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन या जवानांना तरबेज करण्यात आले असून, दीक्षांत सोहळ्यानंतर देशातील विविध भागांत ते अतिरेकी कारवायांचा मुकाबला करतील, अशी अपेक्षा यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक सुनीलकुमार पार्थ यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
दीक्षांत समारंभ उत्साहात
By admin | Updated: April 23, 2015 00:47 IST