औरंगाबाद : महापालिकेच्या जवाहर कॉलनीतील शाळेच्या काही खोल्या श्री साईनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित किडस् प्राईड इंग्लिश स्कूलसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव २० मेच्या सभेत मंजूर करण्यात आला. पालिकेतील सेना-भाजपा सदस्यांसह विरोधकांनीदेखील त्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता प्रस्तावाला मंजुरी दिली. नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रस्ताव ठेवला होता. एकीकडे मराठीच्या नावाने गावभर टेंभा मिरविला जातो आणि दुसरीकडे पालिकेच्या शाळेची इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची सुधारणा करण्याऐवजी त्या शाळा खाजगी संस्थेला भाड्याने देण्याचे प्रस्ताव आणले जात आहेत. या शाळेची फी अत्यंत अल्प आहे. शाळा मध्यमवर्गीयांसाठी कार्यरत आहे. सदरील संस्था दहावीपर्यंत तुकड्या वाढविण्याच्या विचारात आहे. शाळा सामाजिक कार्य करीत आहे. शाळेला स्वत:ची जागा कमी पडते आहे.मनपाची शाळा सुटल्यानंतर दुपारच्या सत्रात काही खोल्या संबंधित संस्थेला देणे आवश्यक आहे, असे कुलकर्णी यांनी प्रस्तावात म्हटले होते. लोकमतशी बोलताना कुलकर्णी म्हणाले, सर्वांच्या सहमतीने तो प्रस्ताव मंजूर झाला आहे. टी. व्ही.सेंटर येथील प्रस्तावित व्यापारी संकुलास छत्रपती संभाजीराजे मार्केट व क्रीडा संकुल, असे नाव देण्याचा प्रस्ताव मुख्य लेखाधिकार्यांनी, मनपात २००५ नंतर सेवेत आलेल्या व पुढे येणार्या कर्मचार्यांना नवीन पारिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करणे, वॉर्ड अधिकारी या पदावर स्वच्छता निरीक्षकांना पदोन्नती देणे, तेजस्विनी मुळे, सिद्धार्थ कदम, कार्तिक शिरोडकर, मधू भंडारकर, आनंद थोरात, स्नेहा ढेपे या खेळाडूंचा सत्कार करणे, तसेच १२४ कर्मचारी भरतीला स्थगिती देऊन दैनिक वेतनावरील कर्मचार्यांना मनपा सेवेत नियुक्त करण्याच्या प्रस्तावांना सभेने मंजुरी दिली.
इंग्रजी शाळेचे वर्ग मनपाच्या मराठी शाळेत भरणार
By admin | Updated: May 22, 2014 00:55 IST