शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘अभियांत्रिकीे’चे होम सेंटर रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी दिले जाणारे होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेसाठी दिले जाणारे होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी परीक्षा विभागाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. मागील दोन सत्रांपासून ‘लोकमत’ने होम सेंटरमध्ये होत असलेल्या गैरप्रकारावर प्रकाश टाकला होता. यावर आता परीक्षा विभागाने शिक्कामोर्तब केले.विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना १५ नोव्हेंबर आणि लेखी परीक्षांना २८ नोव्हेंबरपासून सुुरुवात होणार आहे. या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले. मागील सत्रात १६ मे रोजी मध्यरात्री साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे सील तोडून मध्यरात्री शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात लिहिताना २७ विद्यार्थ्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणामुळे विद्यापीठाची बदनामी देशभर झाली. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने साई अभियांत्रिकीची संलग्नता रद्द केली आहे. या घडलेल्या प्रकारापासून धडा घेत यावेळी अभियांत्रिकीच्या सत्र परीक्षांना होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना विश्वासात घेत नियोजन करण्यात येत असल्याचे डॉ. नेटके म्हणाले. होम सेंटर रद्द करताना बीड, परळी, तुळजापूर, अंबाजोगाई आणि उस्मानाबाद येथील परीक्षा केंद्रांचा नव्याने विचार करावा लागत आहे. या ठिकाणी केवळ एकच अभियांत्रिकी महाविद्यालय असल्यामुळे होम सेंटर रद्द करताना नवीन पर्यायांचा विचार सुरू आहे. या ठिकाणचे होम सेंटर रद्द केल्यास या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुसºया गावी जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे अधिक पर्याय शोधण्यात येत आहेत. यासाठी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची आणखी एक बैठक बोलावण्यात आली.