बीड: सहायक अभियंता पदावर कार्यरत विवाहितेचा पैशासाठी सासरकडील मंडळींनी छळ केला. ती पैसे देत नसल्यामुळे विषारी द्रव पाजल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी येथे पुढे आली.ज्योती नाईक (राठोड) (रा. पांगरी रोड, बीड) या वडवणी पंचायत समितीमध्ये सहायक अभियंता पदावर कार्यरत आहेत. चारचाकी घेण्यासाठी माहेराहून चार लाख रूपये घेऊन ये, असा सासरच्या मंडळींकडून तगादा सुरू होता. गुरूवारी ज्योती यांना एका खोलीत डांबून विषारी द्रव पाजण्यात आले. याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले. त्यांच्या जवाबावरून पती प्रताप राठोड, सासरा वसंत राठोड, सासू सागरबाई राठोड, नणंद नीता जाधव, नंदावा गणेश जाधव, दीर दीपक राठोड यांच्याविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पती प्रताप राठोड पालघर येथे ग्रामसेवक आहे. ज्योती यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)विवाहितेच्या माहेरकडील संतप्त मंडळींनी तिच्या सासरी जाऊन घराची तोडफोड केली. शिवाय संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली.४याप्रकरणी प्रताप राठोड यांनी शिवाजीनगर ठाण्यातच फिर्याद दिली आहे.४१८ जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अभियंता विवाहितेला पाजले विष
By admin | Updated: November 14, 2015 00:52 IST