औरंगाबाद : नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस रेल्वेचे इंजिन शनिवारी बदनापूरजवळ नादुरुस्त झाले. त्यामुळे ही रेल्वे दोन तास उशिराने धावली. शिवाय यामुळे मराठवाडा एक्स्प्रेस एक तास, पुणे पॅसेंजर दोन तास उशिराने धावल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.बदनापूरजवळ नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसचे इंजिन नादुरुस्त झाल्यानंतर पुणे पॅसेंजरचे इंजिन काढून ही एक्स्प्रेस बदनापूर स्थानकावर आणण्यात आली. त्यामुळे जवळपास दोन तास पुणे पॅसेंजर बदनापूर स्थानकावर उभी होती. पुणे पॅसेंजर रेल्वेस विद्यार्थी, नोकरदार प्रवाशांची गर्दी असते. आधीच पॅसेंसर गाड्या उशिराने धावतात. त्यामध्ये एक्स्प्रेस गाडीसाठी पॅसेंजरचे इंजिन लावल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. औरंगाबाद स्थानकाहून नरसापूर -नगरसोल एक्स्प्रेससाठी इंजिन पाठविण्यात आले.
एक्स्प्रेस रेल्वेचे इंजिन नादुरुस्त, गाड्यांना विलंब
By admin | Updated: August 17, 2014 01:45 IST