शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यास गेलेल्या मुलाचा अंत

By admin | Updated: July 25, 2016 01:05 IST

औरंगाबाद : सिडको एमआयडीसीतील एका कंपनीसमोरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

औरंगाबाद : सिडको एमआयडीसीतील एका कंपनीसमोरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा रविवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिकेत रामदास अहिरे (१५, रा. लोकशाही कॉलनी, मुकुंदवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले की, सिडको एमआयडीसीमधील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील खुल्या परिसरात असलेल्या खड्ड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या कॉलनीत राहणारा अनिकेत हा दहावीमध्ये शिकत होता. रविवारी शाळेला सुटी असल्याने तो मित्रासह एमआयडीसी एरियात फिरायला गेला. त्यावेळी त्यास पाण्याचे मोठे डबके दिसले. या डबक्यात पोहण्याचा मोह त्यास आवरला नाही आणि त्याने पाण्यात उडी मारली. मात्र तो पाण्यात बुडाला. अनिकेतला पाण्यातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी अनिकेत यास तपासून ३.१५ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. या घटनेची माहिती लोकशाही कॉलनीत कळताच नागरिकांनी अनिकेतच्या घरी गर्दी केली. अनिकेतचे आई-बाबा भंगार जमा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्याच्या मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. आता अनिकेतच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असल्याची माहिती नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी दिली.