शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांची अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील धार्मिक स्थळांची दोन ठिकाणची अतिक्रमणे शुक्रवारी नागरिकांनी स्वत:हून तर पाच ठिकाणची अतिक्रमणे मनपाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील धार्मिक स्थळांची दोन ठिकाणची अतिक्रमणे शुक्रवारी नागरिकांनी स्वत:हून तर पाच ठिकाणची अतिक्रमणे मनपाच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्तात हटविली.सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली होती. शहरात २० ठिकाणी अशी अतिक्रमणे आहेत. त्यातील ७ अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी कारवाई करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, आयुक्त राहुल रेखावार यांच्या जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने दुपारी ३ वाजेनंतर गुजरी बाजार भागापासून अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली.या भागातील दोन धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाची जागा मनपाच्या पथकाने निश्चित करुन दिली. त्यानंतर नागरिकांनी स्वत:हूनच ही अतिक्रमणे हटविली. त्यानंतर मनपाचे पथक जुना कारेगावरोड कृषी सारथी कॉलनी भागात गेले. तेथे एक ध्वज व अन्य एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण नागरिकांशी चर्चा करुन मनपाच्या पथकाने हटविले. त्यानंतर हे पथक शनिवार बाजार भागात दाखल झाले.या भागातील धार्मिक स्थळाचे समोरील शेड चर्चेअंती काढून घेण्यात आले. त्यानंतर शास्त्रीनगर, पाथरी रोड भागातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण मनपाच्या पथकाने हटविले. दिवसभरात मनपाने पाच ठिकाणचे तर नागरिकांनी स्वत:हून दोन ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. यावेळी आयुक्त राहुल रेखावार, उपमहापौर माजूलाला, अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख तथा मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, सय्यद इम्रान, विजय मोहरीर, मीर शाकेर अली, शिवाजी जाधव, रईस खान, आर.एस.खान, विकास रत्नपारखी, राजू झोडपे, श्रीकांत कुºहा, शेख शादाब आदींची उपस्थिती होती.मोहिमेच्या प्रारंभी आ.डॉ.राहुल पाटील यांनी गुजरी बाजार भागातील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. मनपाची ही मोहीम शांततेत पार पडली.शाळांना दिली सुटी४१७ नोव्हेंबर रोजी धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार असल्याने या संदर्भात १७ नोव्हेंबर रोजीच अचानक जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दुपारच्या सत्रात शहरातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्याचे आदेश प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी व मनपा आयुक्तांना दिले. त्यानुसार शहरातील सर्व शाळा सोडून देण्यात आल्या. अचानक शाळांना सुटी देण्यात आल्याने नागरिकही चकित झाले होते.सकाळपासून पोलीस बंदोबस्त४अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी राबविण्यात येणार असल्याचे १३ नोव्हेंबर रोजीच निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील विविध चौकांमध्ये पोलीस कर्मचाºयांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जवळपास ७०० पोलीस कर्मचारी याकामी नियुक्त करण्यात आले होते. शिवाय शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी हे स्वत: शहरातील विविध भागात भेटी देत असल्याचे पाहावयास मिळाले.