शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या भाजीमंडईवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:33 IST

एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.

वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.

बजाजनगर कामगार नागरी वसाहत अस्तित्वात आल्यावर एमआयडीसी प्रशासनाने भाजीमंडई उभारली. कामगार कल्याण भवन ते मोरे चौक जोडणाऱ्या रस्त्यावर उभारलेल्या भाजीमंईत एमआयडीसीने ओठे बांधून विक्रेत्यांना वाटप केले. दरम्यान, प्रशासनाने भाजीमंडईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजीमंडई धूळ खात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाजीमंडईच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकजण तेथे झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. तर काहींनी शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे.

एमआयडीसीच्या अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटवून विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांमधून होत आहे. या विषयी एमआयडीसीचे अभियंता विनायक मुळे यांच्यशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भाजीपाला विक्रेते रस्त्यावरएमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले आहेत. हक्काची जागा गेल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. विक्रेते रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसी