शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले

By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST

निलंगा :छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला आहे़

निलंगा : गेल्या २५ वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला आहे़ शिवाजी चौक ते हाडगा रोड, बँक कॉलनी रोड, आनंदमुनी चौक या भागात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू आहे़ काही भागातील अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली आहे़ यात प्रथमत: दूध डेअरी, लातूर - बीदर रोडवर भाजी मंडई ही सर्वात मोठी समस्या होती़ आजपर्यंत १५ ते २० वेळा अतिक्रमण काढले़ मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती व्हायची़ मात्र नूतन नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी भाजी विक्रेत्यांना दूध डेअरी पाठीमागे पर्यायी जागा दिली व हे अतिक्रमण उठवले़ बँक कॉलनी रोडवरील उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांना काढण्यात आल्याने या मार्गावरील दुर्गंधी कमी झाल्याने नागरिकांतून स्वागत होत आहे़ याच रोडवर दर शुक्रवारी शेळ्यांचा बाजार भरत असल्याने पशुधन विकास कार्यालयात स्थलांतर केल्याने हा मार्ग मोकळा झाला़ तर शिवाजी चौकातील ट्रॅव्हल्स पॉर्इंट हलवून नाका नं़ १ वर हलविण्यात आला़ अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहुबाजूने सुमारे ९०- १०० हातगाडे हलविण्यात आले असून त्यांना फेरीवाले झोनमध्ये परवानगी देणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले़