शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: March 10, 2017 00:22 IST

जालना : जुना जालना भागातील इंदिरानगरातील प्रस्तावित डीपीरोडवरील अतिक्रमणे गुरूवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली.

जालना : जुना जालना भागातील इंदिरानगरातील प्रस्तावित डीपीरोडवरील अतिक्रमणे गुरूवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. ३० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने गतवर्षी अतिक्रमणे हटविण्यात आली होती. रस्ता मोकळा करण्यात आला होता. मात्र वर्षभरात काही नागरिकांनी पुन्हा अतिक्रमणे केली होती. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही काहींनी पुन्हा अतिक्रमण केले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा भंग नको म्हणून नगर पालिकेने पुन्हा कारवाई करीत गुरूवारी अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान दिलेल्या मार्किंगनुसार गतवर्षीच अतिक्रमणे काढण्यात आली होती. आता पुन्हा अतिक्रमण काढण्याची गरज नव्हती असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने रस्त्याच्या मध्यापासून सत्तर ते शंभर फुटापर्यंत अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. नगर पालिकेने गुरूवारी सकाळीच अधिकारी व कर्मचारी मिळून दीडशे जणांच्या पथकाने इंदिरानगरा कारवाईला सुरूवात केली. पोलिसांचा बंदोबस्तही मोठा होता. या कारवाईला नागरिकांना किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. ३० पेक्षा अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली. गतवर्षी ५५ पेक्षा अधिक पक्क्या घरांचे बांधकाम पाडण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह ४० पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर उपस्थित होते.