शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनापुरतेच उघडले हमीभाव खरेदी केंद्र !

By admin | Updated: May 15, 2017 23:50 IST

लातूर : तूर खरेदी केंद्राचे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच उद्घाटकांबरोबर प्रमुख पाहुण्यांसह केंद्रावरील अधिकारीही भुर्र झाले.

हरी मोकाशे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारपेठेत दर कोसळला. शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळावा म्हणून शासनाच्या आदेशानुसार शहरात आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर खरेदी केंद्राचे नियोजन करण्यात आले. सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास केंद्राचे उत्साहात उद्घाटनही करण्यात आले. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडताच उद्घाटकांबरोबर प्रमुख पाहुण्यांसह केंद्रावरील अधिकारीही भुर्र झाले. त्यामुळे तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागले आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा जास्त आवक होऊ लागल्याने दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. दरम्यान, या केंद्राची मुदत संपुष्टात आल्याने शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली. तरीही आवक होत असल्याचे पाहून पुन्हा तूर खरेदीस मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरातील बाजार समितीतील गुळ मार्केट परिसरात आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोमवारपासून तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी लातुरातील हमीभाव खरेदी केंद्रावर वाहनाद्वारे तूर आणण्यास सुरुवात केली. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती परिसरात लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी उपसभापती मनोज पाटील, लालासाहेब देशमुख, ‘आत्मा’चे पाटील, बाजार समिती सचिव मधुकर गुंजकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. उद्घाटन झाल्यानंतर तुरीचा मापतोल सुरू होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपताच उद्घाटकांसोबत आलेले पाहुणे व केंद्राचे अधिकारीही भुर्र झाले. त्यामुळे रात्रीपासून ताटकळत थांबलेल्या जवळपास शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे आता जायचे कुणाकडे? असा सवाल तूर उत्पादकांसमोर निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी तर आपले वाहन बाजार समितीतील आडत्यांकडेच वळविल्याचे पहावयास मिळाले.