शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घाटीची झोळी रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:00 IST

घाटी रुग्णालयातील अनेक प्रस्ताव आणि कामे निधीअभावी महिनोन्महिने रखडली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अनेक प्रस्ताव आणि कामे निधीअभावी महिनोन्महिने रखडली आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घाटी प्रशासनाने लोकप्रतिनिधींची दारे ठोठावली. परंतु लोकप्रतिनिधींकडूनही आश्वासनांपलीकडे काहीही मिळत नाही. त्यामुळे घाटीची झोळी रिकामीच राहत आहे.नव्याने बांधण्यात आलेले मध्यवर्ती ग्रंथालय आणि वसतिगृह फर्निचरअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. वापराशिवाय या इमारती जुन्या होत आहेत. ग्रंथालय आणि वसतिगृहासाठी आवश्यक फर्निचर, खुर्च्या, कपाट, टेबल, पंखे आदी साहित्य खरेदीसाठी शासनाला २ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव पाठविला आहे; परंतु त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही.दुसरीकडे घाटीला औषधी व साहित्याचा पुरवठा करणाºया विविध कंपन्यांचे पैसे थकल्यामुळे दरपत्रकावरील कंपन्यांनी पुरवठा थांबविला जातो. त्यातून वेळोवेळी औषधी पुरवठा विस्कळीत होतो. औषधांच्या तुटवड्यामुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. औषधांची तब्बल दहा कोटींची बिले प्रलंबित आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी तात्काळ मिळणे आवश्यक आहे. परिणामी वेळोवेळी औषधी तुटवड्याला सामोरे जावे लागते.दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण, कर्मचाºयांची अपुरी संख्या आणि अपुºया सोयी-सुविधांमुळे घाटी रु ग्णालयाच्या रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. २०१३ पासून अनेक कामांना प्रशासकीय मान्यता नसल्याने निधी असूनही कामे खोळंबली आहेत. अशा विविध समस्यांसह २३२ कोटींच्या कामांचा १२ आॅगस्टला खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. तसेच १५ आॅगस्टला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) निधी देण्यात यावा, अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे घाटी प्रशासनाने पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली. आता ग्रंथालय आणि वसतिगृहाच्या फर्निचरच्या निधीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री, वित्तमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे, असे अभ्यागत समितीच्या बैठकीप्रसंगी आ. अतुल सावे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.