शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

बीडमध्ये अफूची शेती करणा-या २५ शेतकर्‍यांना सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: April 7, 2015 18:00 IST

परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकर्‍यांना दोषी ठरवत सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

अंबाजोगाई : परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकर्‍यांना दोषी ठरवत सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अंबाजोगाईतील तिसरे अपर व सत्र न्या. एन.एस. कोल्हे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर १३शेतकर्‍यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २0१२मध्ये अफू शेतीचे प्रकरण उघडकीस आले होते. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात अडकलेले शेतकरी अनेक दिवस जेलमध्ये होते. अफूप्रकरणी एकाच वेळी इतक्या मोठय़ा शेतकर्‍यांना शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे.सुरेश नवृत्ती शेप, पांडुरंग नवृत्ती शेप, संभाजी लिंबाजी शिंदे, बालासाहेब लिंबाजी शिंदे, आत्माराम विनायक शेप, उद्धव विठ्ठल मोरे, मधुकर माणिक शेप, भास्कर त्रिंबक शेप, उद्धव गणपती देशमुख, सदाशिव रघुनाथ थावरे, ज्ञानोबा कोंडीबा मोरे, नवनाथ रघुनाथ थावरे, भीमराव कोंडीबा शिंदे, विष्णू कोंडीबा शिंदे, शेख पाशु शेख महेबुब, भीमराव नेमा राठोड, दिना नेमा राठोड, लाला रामभाऊनिंबाळकर, भगवान कोंडीबा शिंदे, बिभिषण नारायण शेप, हरिभाऊ मुकुंद कोकाटे, सुरेश नेमा राठोड, शिवाजी दगडू राठोड, चंद्रसेन दत्ताेबा थावरे, बापू दत्ताेबा थावरे अशी शिक्षा सुनावलेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत.परळी तालुक्यातील मोहा, वंजारवाडी, घोलपतांडा या ठिकाणच्या ३९शेतकर्‍यांनी २६ एकर दोन गुंठे शेतजमिनीत बेकायदेशीरपणे अफुची लागवड केली होती. हा प्रकार सिरसाळा पोलीस स्टेशनला माहित झाल्याने २४ फेब्रुवारी २0१२रोजी पोलिसांनी कारवाई करून २७ हजार ७७0किलोग्रॅम अफुचे ओले पीक जप्त केले. याची किंमत एक कोटी ३६ लाख रुपये होती. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक लक्ष्मण विठ्ठल मंकावार यांच्या फिर्यादीवरून ३९ शेतकर्‍यांविरूद्ध कलम १८ (ब) ४६ एन.डी.एस. व कलम १९८५च्या अनुवैज्ञानिक औषधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला.या प्रकरणाचा पोलीस तपास बीड येथील गुन्हा व अन्वेशन शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला. या प्रकरणीे पोलिसांनी ३८ जणांना अटक केली होती तर एकजण फरार राहिला. पोलीस तपासानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाईतील तिसरे अप्पर व सत्र न्यायाधीश एन.एस. कोले यांच्या न्यायालयासमोर आले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील किशोर गिरवलकर यांनी २६ साक्षीदार तपासले. व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे सादर केले. तपास पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची व्हीडिओ चित्रफीत न्यायालयासमोर सादर केली. पुरावे ग्राह्य धरून अफुची बेकायदेशीरपणे लागवड करणे, लागवड केल्याची माहिती दडविणे व मनोवैज्ञानिक औषधी प्रतिबंध कायद्यान्वये या २५ जणांना दोषी ठरवून प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख रुपये दंड तसेच कलम ४६ अंतर्गत सहा महिने तेरा शेतकर्‍यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील कायम फरार राहिलेला व्यापारी सुकविंदरसिंह दर्शनसिंग धिल्लो या घटनेपासून आजतागायत फरार आहे.

■ अफू लागवड प्रकरणाची अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे मोहा, घोरपडतांडा व वंजारवाडी, पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी न्यायालयात गर्दी केली होती.