मुखेड : तालुक्यातील गोणेगाव येथील सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोघांना प्रत्येकी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला.गोळेगाव ता. मुखेड येथे केरबाजी सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार झाला आहे. या वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून संतुकराव नागरवाड तर संजय डोरनाळे ग्रंथपाल व भाऊराव डोरनाळे सदस्य आहेत. वाचनालयाच्या अनुदानापोटी शासनाने ५८ हजार ६५० रुपयांचा धनादेश दिला होता, मात्र ग्रंथपाल व सदस्याने वाचनालयाच्या अध्यक्षांच्या नावने खाते उघडून धनादेश जमा करुन रक्कम उचलली. याप्रकरणी वाचनालयाचे अध्यक्ष संतुकराव नागरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला व प्रकरण न्यायालयात पाठविले. याप्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ७ साक्षीदार तपासण्यात आले. न्या. विनोद पाटील यांनी दोघांनाही वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारची बाजू अॅड. आमेर काझी यांनी तर सहाय्यक म्हणून अॅड. अस्लम शेख यांनी काम पाहिले.(वार्ताहर)
दोघांना सक्तमजुरी
By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST