शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

६ हजार उद्योगांचा ‘एम्प्लॉयमेंट ट्रँगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:47 IST

औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत ५२ वर्षांमध्ये स्थापन केलेल्या विविध औद्योगिक वसाहतींतील ६ हजार २०० उद्योगांमुळे भविष्यातील ‘एम्प्लॉयमेंट ट्रँगल’ म्हणून या तीन जिल्ह्यांकडे पाहिले जाणार आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची मराठवाड्यात स्थापना होण्याला उद्या १ आॅगस्ट रोजी ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत ५२ वर्षांमध्ये स्थापन केलेल्या विविध औद्योगिक वसाहतींतील ६ हजार २०० उद्योगांमुळे भविष्यातील ‘एम्प्लॉयमेंट ट्रँगल’ म्हणून या तीन जिल्ह्यांकडे पाहिले जाणार आहे.औरंगाबाद आणि जालना हे दोन्ही जिल्हे पूर्णत: मुंबई-ठाण्याप्रमाणे जवळ येऊ लागले आहेत. कालांतराने समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसीच्या पूर्ण रूपानंतर बीडदेखील याच रेट्याखाली येईल. आॅटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक, स्टील, मद्य, सीडस्, फार्मा, फूड प्रोसेस क्षेत्रातील उद्योग या ट्रँगलमध्ये आहेत. मराठवाड्यात एमआयडीसीची आठ जिल्ह्यांसाठी औरंगाबाद, लातूर आणि नांदेड अशी तीन कार्यालये आहेत. पूर्वी विभागीय कार्यालय औरंगाबादच होते; परंतु माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी परभणी, हिंगोलीसह नांदेड येथे, तर माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी उस्मानाबाद व लातूर येथे प्रादेशिक कार्यालय सुरू केले. १९६२ साली राज्यात एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर १९६५ ला औरंगाबादमध्ये चिकलठाणा, पैठण १९७६, नंतर १९८४ मध्ये वाळूज या औद्योगिक वसाहतींची स्थापना झाली, तसेच १९९४ मध्ये खुलताबाद, १९९७ मध्ये वैजापूर, १९९८ मध्ये शेंद्रा, २०१० मध्ये शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक वसाहतींचा धोरणानुसार उदय झाला.सध्या जालन्यातील ८ औद्योगिक वसाहतींमध्ये ८६८ उद्योग, बीड जिल्ह्यातील ५ औद्योगिक वसाहतींमध्ये ३४७ उद्योग, तर औरंगाबादमधील ८ औद्योगिक वसाहतींमध्ये ४ हजार ९८५ उद्योग आहेत.औरंगाबादमधील शेंद्रा-डीएमआयसी, बिडकीनमधील प्लॉटवर अजून बड्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवलेली नाही. त्यामुळे तेथील प्लॉटस् अजून उद्योगांसाठी देण्याचे धोरण पूर्णरूपाने समोर आलेले नाही. १० हजार एकर जागा औरंगाबाद डीएमआयसी नोडमध्ये उद्योगांसाठी उपलब्ध होईल.