राजकुमार जोंधळे, लातूरलातूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी गणेशमूर्ती निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणावर मूर्तीकारांकडून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात मूर्तीकारांनी केली आहे. या माध्यमातून जिल्हाभरातील एक हजार कारागिरांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. लातूर शहरात वेगवेगळ्या नगरांत एकूण १५ मूर्तीकारांकडून गणेशमूर्ती निर्माण करण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू होते. या व्यवसायात गेल्या ५० वर्षांपासून काम करणारे कुटुंब सध्याला कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या माध्यमातून या गणेशमूर्तींच्या निर्मितीचे काम केले जाते. कल्पक आणि आकर्षक गणेशमूर्तींना उत्सव मंडळांकडून अधिक मागणी असल्यामुळे अशा गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी कारागिरांकडून अधिक प्रयत्न केले जातात. जशी मागणी, तसा पुरवठा या न्यायाने या व्यवसायात मूर्तीकारांना आपले काम करावे लागते. लातूर शहरासह निलंगा, औराद शहाजानी, देवणी, वलांडी, औसा, लामजना, किल्लारी, उजनी, भादा, मुरुड, चाकूर, उदगीर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, जळकोट, हाळी हंडरगुळी, वाढवणा आदी ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती निर्मितीचे काम केले जाते. आता सर्व मूर्तीकार गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवीत आहेत.
दीडशे मूर्तीकारांकडून १ हजार कारागिरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 01:16 IST