वसमत: कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वसमत तहसीलसमोर मंगळवारपासून हे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. बुधवारीही हे आंदोलन सुरूच होते. वेतनश्रेणी व दर्जाबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, कृषी विभागाच्या योजना जि.प.कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करावा यासह १३ मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वसमत तहसीलसमोर मंगळवारपासून धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात एन. एम. देशमुख, एम. एस. इंगोले, शिवदास खाकरे, एस. जे. रावळे, शरद देशमुख, एन. व्ही. लोखंडे, आर. एस. संद्री, अनिरुद्ध पुंडगे, नवघरे, लोखंडे, सरनाईक, मुंडे, कुंभारकर आदींनी सहभाग नोंदविला. कळमनुरी कृषी विभागकळमनुरी : विविध मागण्यांसाठी येथील तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर १२ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन केले. कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जा वाढीबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंलमबजावणी करावी, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करा, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण द्यावे, शून्य अधारित अर्थसंकल्पात कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी नियमित करा, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करा, आदी मागण्यांसाठी एक दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी डी. बी. काळे, पी. पी. पल्लेवाड, व्ही. डी. घुगे, एस. एन. सावंत, एस. एच. राठोड, डी. सी. जाधव, यू. बी. पवार, बी. जी. मस्के, शेळके, घोंगडे, स. रहीम, सातपुते, ए. व्ही. पडघन, आर. बी. भोजे, टी. एल. मते, बी. आर. इंगळे आदी उपस्थित होते.औंढा कृषी विभागऔंढा नागनाथ : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तहसीलदार श्याम मदनूरकर यांना मंगळवारी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात १६ जूलै २००४ च्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे, कृषी सहाय्यकांची पदोन्नती करणे आदी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीन टप्प्यात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्ल्याचा इशारा निवेनात देण्यात आला आहे. निवेदनावर मंडळ कृषी अधिकारी एस. एस. शेळके, कृषी सहाय्यक जी. डी. राठोड, सी. एस. कल्याणकर, बी. जी. कीर्तने, आर. बी. हुलेकर, बी. आर. पवार, आर. एस. भिसे, जी. पी. लोसरवार, एल. ई. खंटींग, जी. यु. भोजे, एन. व्ही. म्हैसेकर, जी. जी. दरेगावकर, गच्चे, जी. एन. सोनुने, ए.एम. गोरे, डी.एल. माने, के.टी. खिल्लारे, वाय.एस. धाबे, एन.बी. चव्हाण, पी.आर. टेकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू
By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST