शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

औरंगाबाद : शिर्डी येथील साईबाबा संस्थानमधील कायम, कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची परवानगी न्या. एस. पी. देशमुख आणि ...

औरंगाबाद : शिर्डी येथील साईबाबा संस्थानमधील कायम, कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची परवानगी न्या. एस. पी. देशमुख आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१०) संस्थानच्या तदर्थ समितीला दिली. तसेच कोरोना महामारीत आरोग्यसेवक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४० टक्के वाढीव वेतन देण्यास सुद्धा परवानगी दिली .

साईबाबा संस्थानने ३१ ऑक्टोबर २०२० रोजी कायम, कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा आणि आरोग्यसेवकांना ४० टक्के वाढीव वेतन देण्याचा निर्णय बहुमताने घेतला होता. सदर ठरावानुसार परवानगीसाठी संस्थानने खंडपीठात अर्ज दाखल केला होता. शासनामार्फत नवीन विश्वस्त नियुक्त होईपर्यंत अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिकचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, आणि अहमदनगरचे सह धर्मादाय आयुक्त यांची समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार ९ ऑक्टोबर २०१९ च्या आदेशान्वये दिले होते. सदर समिती ऑक्टोबर २०१९ पासून साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत आहे . खंडपीठाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेत आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. सतीश तळेकर आणि प्रज्ञा तळेकर यांच्या वतीने अजिंक्य काळे व किरण नगरकर यांनी काम पहिले, संस्थानच्या वतीने ॲड. अनिल बजाज व शासनाच्या वतीने ॲड. डी .आर .काळे यांनी काम पाहिले.