लातूर : लातूर जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयातील ८० कर्मचारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या कामकाजामुळे हैराण आहेत. चार महिन्यांत सुमारे चारशे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी रात्री-बेरात्रीही कामकाज करावे लागत असल्यामुळे ताण वाढला आहे.सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल जानेवारी महिन्यात वाजले. वर्ग अ,ब,क,ड अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांची मतदार यादी तयार करणे, आक्षेप, त्यावरील त्रुटी, उमेदवारी अर्ज, छाननी प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे़ ‘अ’ वर्गतील सहकारी संस्थांमध्ये ६ संस्था असून, तीन साखर कारखाने, दोन सूतगिरण्या व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे़ यातील तीन कारखान्यांची निवडणूक झाली. दोन सूत गिरण्यांची निवडणूक पार पडली. ‘ब’ गटातील ६५ सहकारी संस्थांच्या पैकी ५३ संस्थांची निवडणूक होत आहे. त्यातील १५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ ३८ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे़ मतदार याद्या प्रकाशीत करण्याची प्रक्रिया चालू आहे़ ‘क’ वर्गातील ३५० सहकारी संस्था आहेत़ (प्रतिनिधी)
निवडणूक कामांमुळे कर्मचारी हैराण
By admin | Updated: April 14, 2015 00:40 IST