शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीए होताना प्रत्यक्ष अनुभवावर जोर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:10 IST

चार्टर्ड अकाऊं टंट (सीए) म्हणून करिअर करताना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला अधिक महत्त्व देण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी दिला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चार्टर्ड अकाऊं टंट (सीए) म्हणून करिअर करताना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला अधिक महत्त्व देण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊं टंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी दिला. ‘लोकमत’ व सीए संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२६) लोकमत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मंचावर ‘आयसीएआय’च्या बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे, केंद्रीय समितीचे सदस्य सीए प्रफुल्ल छाजेड, सीए अनिल भंडारी, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सीए शैलेश चांदीवाल, डब्ल्यूआयआरसीचे सदस्य सीए उमेश शर्मा, सीए संघटनेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका, सीए रोहन अचलिया आणि सीए पंकज सोनी उपस्थित होते.‘सीए म्हणून करिअर व सीए अभ्यासक्रमातील बदल’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भारतातील सीए कोर्स अद्ययावत अभ्यासक्रम, संवाद कौशल्य, माहिती व तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव (आर्टिकलशीप) या चार घटकांवर आधारलेला आहे. एक परिपूर्ण सीए होण्याकरिता गरजेच्या सर्व बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.उद्योगजगतातून नेहमी तक्रार केली जाते की, सीए विद्यार्थी तांत्रिक बाबतीत सक्षम असतात. मात्र, ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोजनाच्या बाबतीत कच खातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, सामान्य ज्ञान, संवाद कौशल्य आदी आवश्यक कौशल्य अवगत केले पाहिजे, असे ते म्हणाले.तत्पूर्वी सीए शर्मा यांनी सीए व त्याच्याशी संबंधित करिअर संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) देशात अकाउंटंटची मागणी वाढली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सीए होऊ शकणार नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही’, असे ते म्हणाले. ओमप्रकाश केला म्हणाले, करिअरच्या दृष्टीने सीए हे उत्तम क्षेत्र आहे. सीए व्यक्ती कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो. सीए हर्षा तोतला यांनी सूत्रसंचालन केले.