शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने मनपाला देण्यावर भर

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

औरंगाबाद : डेंग्यूच्या साथीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ पसरत असून, आतापर्यंत दहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला

औरंगाबाद : डेंग्यूच्या साथीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ पसरत असून, आतापर्यंत दहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर रोजी चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात दोनशेहून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. याप्रसंगी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने मनपाला देण्याबाबत डॉक्टरांना आवाहन करण्यात आले.डेंग्यू होण्यापूर्वी रुग्णाच्या पोटात दुखणे, उलटी होणे, रक्तस्राव होणे, यकृतावर २ सेंटीमीटरपेक्षा अधिक सूज येणे, पेशी कमी होणे, एच.सी.टी. वाढणे, प्लेटलेट कमी होणे इ. लक्षणे दिसून येतात. डॉ. दिलीप मुळे यांनी डेंग्यू विकारात रक्तचाचण्याचे महत्त्व आणि मर्यादा याविषयी मार्गदर्शन केले. डेंग्यू आजार गुंतागुंतीचा असूनसुद्धा रुग्ण कमी वेळेत सावरतात. डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे म्हणाले की, अतिगंभीर रुग्णाला रक्तस्राव होत असल्यास ताजे रक्त व प्लेटलेटची गरज भासू शकते. तसेच ब्रुफेन, अ‍ॅस्पिरीन आणि स्टेरॉईड या औषधांचा वापर यावेळी टाळावा.मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी डेंग्यूसारख्या साथरोगाचा अहवाल डॉक्टरांनी कसा सादर करावा, याबाबत माहिती दिली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र लाठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. पर्सी जिल्ला, डॉ. सचिन फडणीस, डॉ. वर्षा आपटे, डॉ. तुंगीकर आदींची उपस्थिती होती. डॉ. अपर्णा राऊळ यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालनकेले.