शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा मागण्यांसदर्भात एल्गार

By admin | Updated: April 6, 2017 23:14 IST

बीड : जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी एल्गार पुकारला. याप्रसंगी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

बीड : शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याकरिता समिती गठीत केलेली आहे. या समितीच्या प्रस्तावानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी बीड येथे जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी एल्गार पुकारला. याप्रसंगी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बीड शहरातील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे मेळावा घेऊन त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही आमच्या प्रश्नाकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष कमल बांगर यांनी केला आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानधन दरमहा पाच तारखेपर्यंत अदा करणे आवश्यक आहे. मात्र, असे होत नसल्याचे पहावयास मिळते. जुलै २०१३ पासून मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र सरकारने ७५० रूपयांची वाढ केलेली आहे. वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती करूनही अद्यापपर्यंत सदरील थकीत मानधनातील फरक अदा करण्यात आलेला नाही. हा फरक शासनाने तात्काळ अदा करावा.अंगणवाडी सेविकांना उन्हाळी सुट्या एक महिन्याच्या देण्यात याव्यात. अनेक वेळा सेविका व मदतनीस यांना सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याची तरतूद नाही. यापुढील काळात सेविकांना व मदतनीस यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्याची तरतूद करावी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एक महिन्याची आजारी रजा देण्यात यावी, ही मागणी अनेक वर्षांपासून महासंघाच्या वतीने करूनही शासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी महिलांनी केला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)