शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वीज नियामक आयोगाने केली जीटीएलची याचिका खारीज

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

औरंगाबाद : वीज खरेदी करणाऱ्या जीटीएल कंपनीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची एलबीटी भरण्याची नोटीस महानगरपालिकेने पाठविली.

औरंगाबाद : वीज खरेदी करणाऱ्या जीटीएल कंपनीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची एलबीटी भरण्याची नोटीस महानगरपालिकेने पाठविली. ही एलबीटी शहरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात यावी, अशी याचिका जीटीएलने वीज नियामक आयोगाकडे दाखल केली होती; मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आयोगाने जीटीएलची याचिका खारीज केली आहे. महानगरपालिकेने जकात कर रद्द करून १ जुलै २०११ पासून एलबीटीची आकारणी सुरू केली. महावितरणकडून वीज खरेदी करून जीटीएल कंपनी महानगरपालिका हद्दीत वीज वितरण व वसुलीचे काम करीत आहे.या वीज खरेदीवर मनपाने एलबीटी आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २२ आॅक्टोबर २०१२ रोजी एलबीटीच्या थकबाकीपोटी ४ कोटी ७५ लाख ६५ हजार १४३ रुपये भरण्यासाठीची नोटीस जीटीएलला बजावली होती.याविरोधात जीटीएलने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार जीटीएलला एलबीटी करापोटी १ कोटी २५ लाखाची रक्कम मनपात भरावी लागली. याच दरम्यान जीटीएलने आणखी एक याचिका वीज नियामक आयोगाकडे दाखल केली.यात मनपाने कंपनीकडून एलबीटी वसूल न करता थेट विद्युत ग्राहकांकडूनच वसूल करावी अशी मागणी करण्यात आली होती. आयोगात या याचिकेवर सुनावणी झाली.१० सप्टेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने जी. आर. काढला आहे. यानुसार विजेवर एलबीटी कर आकारण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जीटीएलची याचिका उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे.या दोन्हीचा विचार करून वीज नियामक आयोगाने जीटीएलची याचिका खारीज केली.आयोगाचे अध्यक्ष चंद्रा अय्यंगार व सदस्य विजय सोनवणे यांनी ७ एप्रिल २०१४ रोजी हा निकालदिला.