शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

By admin | Updated: June 19, 2014 23:51 IST

कळंब : भारनियमन करू नका, असे म्हणत वीज उपकेंद्रात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून धमकी दिल्याची घटना घडली.

कळंब : भारनियमनाच्या कालावधीत भारनियमन करू नका, असे म्हणत वीज उपकेंद्रात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून धमकी दिल्याची घटना तालुक्यातील गोविंदपूर येथील उपकेंद्राच्या कार्यालयात मंगळवारी रात्री सात वाजता घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सातजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र व दुय्यम अभियंता कार्यालय आहे. याअंतर्गत परिसरातील देवधानोरा, बोरगाव (खु) आदी गावांना वीज पुरवठा केला जातो. सध्या या गावांना ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारनियमन करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी गोविंदपूर केंद्राचे दुय्यम अभियंता बाळकृष्ण मुरलीधर डोके व यांत्रिकी कर्मचारी हे कार्यालयात काम करीत असताना बालाजी बोंदर, सुरेश सुतार, नामदेव बोंदर, दत्ता बोंदर (सर्व रा. देवधानोरा) तसेच नितीन रणदिवे, शरद तनपुरे, विठ्ठल मासाळ (रा. बोरगाव खु), हे कार्यालयात दाखल झाले. त्यांनी भारनियमन बंद करा, असे म्हणून या दोघांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करून धमकी दिली, अशी फिर्याद दुय्यम अभियंता डोके यांनी शिराढोण पोलिस ठाण्यात दिली आहे.यावरून बालाजी बोंदर, सुरेश सुतार, नामदेव बोंदर, दत्ता बोंदर, नितीन रणदिवे, शरद तनपुरे, विठ्ठल मासाळ यांच्यासह इतर दहा ते बारा लोकांविरूध्द भादंवि कलम ३५३, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोहेकॉ बी. एस. चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)