शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तातडीच्या भारनियमनाखाली विजेचा लपंडाव

By admin | Updated: May 1, 2017 00:34 IST

जालना : शहरात गत तीन दिवसांपासून भारनियमन होत असल्याने सकाळ तसेच दुपारी वीजपुरवठा बंद असतो.

जालना : शहरात गत तीन दिवसांपासून भारनियमन होत असल्याने सकाळ तसेच दुपारी वीजपुरवठा बंद असतो. मात्र तातडीच्या नावाखाली हे भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक पाहता शहरात महावितरणने अधिकृत भारनियमनाची सूचना केलेली नाही. जालना शहरात पाच उपकेंद्रातून सुमारे ४० हजारपेक्षा अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. यासाठी ५० पेक्षा अधिक फिडर आहेत. महावितरणकडून ज्या भागात वसुली कमी तसेच वीज गळती जास्त आहे याचा अभ्यास करून त्या त्या भागात तातडीचे भारनियमन केले जात आहे. सकाळी दीड तास तसेच दुपारी दीड अनेक भागात वीजपुरवठा बंद असतो. यात जुना व नवीन जालना भागातील ज्या वसाहती अथवा प्रभागात वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे, त्यानुसार भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाचा पारा ४० ते ४२ अंशांवर जात आहे. त्यातच दुपारी वीज बंद असल्याने नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत.तातडीच्या भारनियमनाबाबत महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात येत नाही. अचानक वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)