शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदाची निवडणूक २ जूनला

By admin | Updated: May 24, 2016 01:19 IST

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाच विषय समित्यांच्या

औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मनपा स्थायी समिती सभापती निवडीकडे लागले आहे. स्थायीमधील १६ पैकी ८ सदस्य ३० एप्रिल रोजी नियमानुसार निवृत्त झाले. त्यानंतर १० मे रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत रिक्त सदस्यांच्या जागेवर पक्षनिहाय नवीन सदस्य निवडण्यात आले. मनपाच्या नगर सचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २ जून रोजी स्थायी समिती व पाच विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी निवडणूक होणार आहे. सकाळी १० वाजता स्थायी समितीची, तर त्यानंतर ११ वाजता पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. शिवसेना-भाजप युतीमधील करारानुसार यंदा सभापतीपद सेनेच्या वाट्याला आले आहे. स्थायी समितीमध्ये सेनेचे सहा सदस्य आहेत. स्थायीत जाण्यासाठी यंदा सेनेतील दिग्गज नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन आणि राजू वैद्य यांनी कसोशीने प्रयत्न केले. पक्षश्रेष्ठींनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले सीताराम सुरे यांच्यावर विश्वास दाखविला. आता सभापतीपदासाठी सेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ज्येष्ठ नगरसेवक मोहन मेघावाले यांच्यासह सीताराम सुरे यांनीही कंबर कसली आहे. नवीन चेहरा देण्याचा विचार पक्षाने केल्यास मकरंद कुलकर्णी, रावसाहेब आमले यांचा क्रमांक लागू शकतो.