शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरही निवडणूक विभागाची नजर

By admin | Updated: September 15, 2014 00:41 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे. सोशल साईटस्वरील पोस्टमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग किंवा कुणाचे चारित्र्यहनन होते का हे निवडणूक शाखेकडून तपासले जाणार आहे. तसेच कोणतीही आॅडिओ, व्हिज्युअल जाहिरात सोशल साईटस्वर टाकायची असेल तर आधी निवडणूक विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. राज्यात शुक्रवारपासून विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रचाराच्या काळात कुठे आचारसंहितेचा भंग होतो का यावर आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी आचारसंहिता सेल स्थापन करण्यात आला आहे. या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर यासारख्या सोशल साईटस्चा प्रचारादरम्यान उमेदवारांकडून वापर होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभाग सोशल साईटस्वरही बारीक नजर ठेवणार आहे. उमेदवारांना सोशल साईटस्चा वापर करता येणार असला तरी त्याबाबतही आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, सोशल मीडियासंदर्भात सायबर लॉ हा स्वतंत्र कायदा आहेच. त्याअंतर्गत कुठेही कायद्याचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणाचे चारित्र्यहनन करणे किंवा कुणाची बदनामी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल साईटस्वर पोस्ट टाकताना याची काळजी घ्यावी. याशिवाय उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना सोशल साईटस्वर आॅडिओ, व्हिज्युअल जाहिराती टाकायच्या असतील तर त्याआधी प्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक शाखेकडून प्रमाणित न करता अशी जाहिरात सोशल साईटस्वर टाकल्यास आचारसंहितेचा भंग समजला जाईल. तसे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदविला जाईल.