शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कृउबा निवडणुका‘कलेक्टर’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्या ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनल्या आहेत. या बाजार समित्यांवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यामुळे कृउबाच्या निवडणुकीलाही जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच आता कृउबाच्या यापुढील सर्व निवडणुका जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात होणार आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात १० बाजार समित्या : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समित्या ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनल्या आहेत. या बाजार समित्यांवर ताबा मिळविण्यासाठी सर्व पक्ष प्रतिष्ठा पणाला लावतात. यामुळे कृउबाच्या निवडणुकीलाही जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच आता कृउबाच्या यापुढील सर्व निवडणुका जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात होणार आहेत.राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १० कृउबा आहेत. यात औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, लासूर स्टेशन, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव यांचा समावेश होतो.पूर्वी जिल्हा उपनिबंधकांच्या (सहकार) देखरेखीखाली कृउबाच्या निवडणुका होत असत; मात्र आता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम १३, कलम १४ आणि १४-अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या कलम ११ नुसार कृउबाच्या सभापती आणि उपसभापतींसह अन्य सदस्यांच्या समितीचे गठण केले जाते.या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार याद्यांचे अधीक्षण, संचालन, नियंत्रणाचे आणि निवडणुका घेण्याचे काम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून केले जाते.प्राधिकरणाची क्षेत्रिय यंत्रणा म्हणून जिल्हाधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे तलाठ्यापर्यंतची महसुली यंत्रणा काम करीत असते. त्यामुळे या यंत्रणेचा बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये उपयोग होऊ शके ल. या निर्णयामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र वगळण्यात आले आहे.२ वर्षांचा अवधीजाधववाडी येथील कृउबा समितीच्या सध्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळाचा कार्यकाळ ५ आॅगस्ट २०२० मध्ये संपणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या आत निवडणुका होतील.आता शेतकºयांना मतदानाचा अधिकारकृउबा समितीच्या संचालक मंडळ निवडीचा अधिकार आता शेतकºयांना देण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीच्या क्षेत्रातील शेतकºयांना ‘मतदाना’चा हक्क प्राप्त झाला आहे. ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले, १० गुंठे जमीन असलेला शेतकरी बाजार समितीचा मतदार होऊ शकतो. संबंधित बाजार समितीमध्ये त्याने पाच वर्षांतून किमान तीन वेळा व्यवहार केलेले असणे अपेक्षित आहे. या मतदारांची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.