नळदुर्ग : किरकोळ कारणावरून एकास चाकूने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास निलेगाव (ता़तुळजापूर) शिवारात घडली़पोलिसांनी सांगितले की, निलेगाव गावच्या शिवारात शेत आहे़ मंगळवारी सकाळी या शेतातील उसाच्या फडात जनावरे पाहून प्रदिप दुधभाते यांनी मल्लिनाथ उर्फ पिंटू दुधभाते यांना आमच्या उसात जनावरे का सोडली असा जाब विचारला होता़ त्यावेळी मल्लिनाथ यांच्यासह नागनाथ दुधभाते, व्हनाप्पा दुधभाते, शिवाजी दुधभाते यांनी प्रदिप यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले़ या प्रकरणी गंगाबाई दुधभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि जी़एच़पठाण हे करीत आहेत़ (वार्ताहर)
निलेगाव येथे एकास भोसकले
By admin | Updated: September 17, 2014 01:12 IST