शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एकास कोठडी, एक बालसुधारगृहात

By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST

उस्मानाबाद : सराफ व्यापाऱ्यास मारहाण करून रोकड, दागिने लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकास न्यायालयाने १४ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़

उस्मानाबाद : सराफ व्यापाऱ्यास मारहाण करून रोकड, दागिने लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकास न्यायालयाने १४ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ तर एकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी आणखी एकास अटक करण्यात आली असून, इतर मुद्देमालाचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़याबाबत पलिसांनी सांगितले की, मुंबई येथील सराफा व्यापारी मुकेश मेहता यांना ४ आॅगस्ट रोजी शहरातील येमाई मंदिराजवळ मारहाण करून लूटले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि माधव गुंडिले, पोउपनि भास्कर पुल्ली, दरोडा प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ६ आॅगस्ट रोजी शहरातील भानुनगर भागात राहणाऱ्या तरूणांनी या व्यापाऱ्यास लुटल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी गुरूवारी रात्री भानुनगर येथून प्रवीण नामदेव राठोड, सूरज चंद्रकांत नाईक, पवन रघुनाथ टेहरे व एक अल्पवयीन अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता या चौघांनीही अन्य दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे कबूल केले. यावरून त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख १४ हजार ८०० रूपये रोख व १२ लाख ५१ हजार ६०० रूपये किंमतीचे दागिने असा एकूण १३ लाख ६६ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ प्रविण राठोड, प्रविण उर्फ पवन रघूनाथ टेहरे यास न्यायालयाने यापूर्वीच पोलिस कोठडी सुनावली आहे़ तर अटकेतील सुरज नाईक यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता १४ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़ तर शुक्रवारी पोलिसांनी विजय कवळेकर या युवकास अटक केली असून, उर्वरित मुद्देमालाचाही शोध सुरू असल्याचे तपासाधिकारी पोनि रायकर यांनी सांगितले़