रेल्वे स्टेशन रोडवरील नाल्यात बांधकाम मलबा
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील नाल्यामध्ये पाडलेल्या बांधकामाचा मलबा टाकला आहे. त्यातून नाला अरुंद होऊन नाल्याचा प्रवाह बंद होण्याची शक्यता आहे. त्याकडे महापालिकेने लक्ष देऊन मलबा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच
बंद पडली एसटी
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच मंगळवारी दुपारी एसटी बंद पडली. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या बसगाड्यांना बसस्थानकात प्रवेश करण्यास अडचणी येत होत्या. बऱ्याच वेळ ही बस प्रवेशद्वारासमोरच उभी होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा झाला.
घाटीतील इमारतींच्या टेरेसवर झाडीझुडपी
औरंगाबाद : घाटीतील सर्जिकल इमारतीपासून अन्य इमारतींवर जागोजागी झाडी वाढली आहे. परंतु त्याबरोबर इमारतीच्या टेरेसवरही झाडीझुडपी वाढली आहे. त्याकडे घाटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही झाडीझुडपी हटविण्याची मागणी होत आहे.
त्रिमूर्ती चौकात विद्युत वाहिन्या लोंबकळत
औरंगाबाद : शहरातील त्रिमूर्ती चौकात विद्युत वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहे. याठिकाणाहून उंच वाहन नेण्यासाठी अडचणीला सामोरे जावे लागते. त्यातून अपघाताचाही धोका नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने ही अवस्था दूर करण्याची मागणी होत आहे.