शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांनंतरही औसा-लातूर रस्ता खड्ड्यातच !

By admin | Updated: November 10, 2014 23:57 IST

रमेश शिंदे ,औसा औसा- लातूर हा २० कि.मी.चा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते या रस्ता कामाचे उद्घाटनही झाले.

रमेश शिंदे ,औसाऔसा- लातूर हा २० कि.मी.चा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते या रस्ता कामाचे उद्घाटनही झाले. परंतु, अद्यापही औसा-लातूर हा रस्ता खड्ड्यातच आहे. हा रस्ता कधी पूर्ण होईल, याकडे अशी अपेक्षा प्रवाशांसह वाहनधारकांतून होत आहे़औसा हा लातूरला सर्वात जवळचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याबरोबरच परिसरातील नागरिक व वाहनधारकांचा दररोज लातूरशी संपर्क असतो़ त्याचबरोबर लोहारा, उमरगा व निलंगा तालुक्यासह कर्नाटक राज्यातील शेतीमालही लातूरच्या बाजारपेठेत येतो. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा केली. बांधा वापरा व हस्तांतरीत करा, या योजनेअंतर्गत या रस्त्याचे कामही सुरू झाले. पण त्यानंतर अचानक हे काम बंद पडले. त्यानंतर जो कंत्राटदार हे काम करीत होता, त्याच्यात आणि यंत्रणेतही बेबनाव झाला आणि या वादात मागील आठ वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आदळआपट सहन करावी लागत आहे. हे काम आता दुसऱ्या कंत्राटदारास सुटले असून, या कामाची सुरुवातही झाल्याचे सांगण्यात येते़ दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. मागील आठ वर्षांमध्ये शंभरपेक्षा अधिक लोकांना अपघातात जीव गमवावे लागले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही आठ वर्षे या रस्त्याचे काम रखडले आणि आठ वर्षानंतरही औसा-लातूर रस्ता मात्र खड्ड्यातच आहे. हा रस्ता पूर्ण कधी होणार आणि औसा-लातूर हा प्रवास सुखकर कधी होणार, याकडे मात्र प्रवाशांचे लक्ष लागले आहे.