शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

आठ लाख भाविकांनी वेचला चुना

By admin | Updated: April 23, 2016 23:52 IST

येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला असून, शनिवारी यात्रेतील महत्त्वपूर्ण असणारा चुना वेचण्याचा सोहळा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला असून, शनिवारी यात्रेतील महत्त्वपूर्ण असणारा चुना वेचण्याचा सोहळा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात पार पडला. झांज, हलगी व संबळाच्या गजरात ‘आई राजा उदो उदोऽऽ' चा घोष करत राज्यभरातून जवळपास आठ लाख भाविक या सोहळ्यात दाखल झाले होते. तळपत्या उन्हाच्या काहिलीत तब्बल चार-पाच किलोमिटरच्या परिघात हा भक्तीचा मळा फुलला होता. आगामी पाच दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे.कळंब तालुक्यातील येरमळा येथे देवी येडेश्वरीचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील पोर्णिमेला येडेश्वरी देवीची पाच दिवसीय यात्रा भरते. यानिमित्त विविध पारंपारिक धार्मिक उपक्रम विधीवत पार पाडले जातात. शुक्रवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिरात छबीना मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी आठ वाजता मंदिरात देवीची पूजा व महाआरती करण्यात आली. यानंतर देवीच्या पालखीचे मंदिरातून गावाकडे प्रस्थान झाले. सवाद्य निघालेली पालखी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात दाखल झाली. याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जागोजागी, चौकाचौकात रांगोळीचा आरास करण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखीसोहळा चुन्याच्या रानात दाखल झाला. येथे पारंपारिक पध्दतीने चुना वेचण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान देवीची पालखी आमराईत दाखल झाली. दरम्यान, येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेत शनिवारी पार पडलेल्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला खूप मान आहे. यामध्ये आसपासच्या जमिनीत असलेल्या चुन्याचे खडे वेचून पालखीजवळ टाकले जातात. जमा झालेला चुना पाचव्या दिवशीच्या घुगरी महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी भाजून याचा पोथरा मंदिराला व गाभाऱ्याला दिला जातो. गेल्या अनेक वषार्पासून सुरू असलेली ही परंपरा येरमळा यात्रेत मोठ्या श्रद्धेने पार पाडली जाते. शनिवारी या कार्यक्रमास राज्याच्या काना कोपऱ्यातून जवळपास आठ लाख भाविक दाखल झाले होते. झांज, संबंळ, हलगीच्या तालावर ठेका धरत, आई येडाईचा उदो उदो असा जयघोष करीत लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने पालखी समवेत येवून या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी आ. राणा जगजितसिंह पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमूख सुधीर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सरपंच विकास बारकूल, मानकरी अमोल पाटील, यशवंत पाटील, मंदिर संस्थानचे समाधान बेदरे, बापूसाहेब बेदरे, संजय बारकूल, संजय निचळे यांनीही उपस्थिती लावली होती. (वार्ताहर) कडक उन्हाळ्यात देवीची चैत्री यात्रा भरल्यामुळे येथे आलेल्या लाखो भाविकांची तहान भागविण्याचे शिवधनुष्य प्रशासन कसे पलवणार, असा प्रश्न पडला होता. परंतु, सुयोग्य नियोजन, सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून पुढे आलेले मदतीचे हात यामुळे तीव्र दुष्काळातही यात्रा स्थळी पाण्याचा सुकाळ दिसून आला. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही याठिकाणी भाविकासाठी थंड पाण्याची चांगली सोय केली होती.