शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

२४ तासांत आठ दलघमी साठा

By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST

बीड : एक महिना दडी मारून बसलेला पाऊस चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी बरसत आहे. माजलगाव धरणात गेल्या २४ तासांत ८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला

बीड : एक महिना दडी मारून बसलेला पाऊस चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी बरसत आहे. माजलगाव धरणात गेल्या २४ तासांत ८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला असल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात एकूण १४४ सिंचन प्रकल्प असून, ११३६.९४ द.ल.घ.मी. एवढी त्यांची साठवण क्षमता आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरीदेखील धरणे कोरडीठाक आहेत. १४४ प्रकल्पांत माजलगाव व मांजरा या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. माजलगाव धरणात २४ तासांत ८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला असून, सद्य:स्थितीत एकूण ८७ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे, मांजरा प्रकल्पात पाण्याचा टिपूसही दिसत नाही. जिल्ह्यातील पावसाची सद्य:स्थितीमागील २४ तासांत झालेला पाऊस (कंसात आतापर्यंतचा पाऊस): बीड-४.४ (२८७.१), पाटोदा- १.३ (३६८.८), आष्टी- ०.० (३०७.७), गेवराई- ११.३ (३६१.४), शिरूर- ७.० (३१२.३), वडवणी- १७.५ (४९७.३), अंबाजोगाई-६.४ (४१८.०), माजलगाव- २२.० (५२९.४), केज- ४.० (३६२.९), धारूर- २.० (३१३.३), परळी- १९.८ (३६१.४). (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात एकूण १४४ प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पात बीड विभागात ४, तर परळी विभागात ६ प्रकल्प असून, यामध्ये १२.५९ द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणी साठा आहे.४लघु प्रकल्पांमध्ये जिल्ह्यात एकूण ९९ प्रकल्प आहेत. यामध्ये बीड विभागात ४६, तर परळी विभागात ५३ प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये १३.६३ द.ल.घ.मी. एवढा उपयुक्त पाणी साठा असल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या साप्ताहिक पाणी साठा गोषवारा अहवालात म्हटले आहे.४जिल्ह्यात आजघडीला एकूण ३.८८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना लागली आहे.