शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ईद उत्साहात

By admin | Updated: June 27, 2017 00:52 IST

जालना : महिनाभर रोजे करून अल्लाहची इबादत केल्यानंतर जालना शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिनाभर रोजे करून अल्लाहची इबादत केल्यानंतर जालना शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली. जुना जालन्यातील ईदगाह मैदानावर सकाळी हजारोंच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यानंतर गळाभेट घेत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह दिसून आला. शहरातील विविध मशिदींमध्ये सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत नमाज पठण करण्यात आली. ईदगाह मैदानावर झालेल्या मुख्य नमाज पठणास हजारो मुस्लिम बांधव नवीन पोशाख परिधान करून उपस्थित होते. ईदगाह मैदानावरील जागा अपुरी पडल्यामुळे नमाज पठणासाठी मुख्य रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयापर्यंत गर्दी दिसून आली. मौलाना गुफरान यांनी नमाज पठण केले. या वेळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, प्रभारी जिल्हाधिकारी बी.पी. खपले, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार बिपीन पाटील, पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी अध्यक्ष शब्बीर अन्सारी, डॉ. मोहंमद बद्रोद्दीन, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हफिज, शहाआलम खान, शेख महेमूद, मोहन इंगळे, गणेश सुपारकर, तय्यब देशमुख आदींची उपस्थिती होती. उपस्थितांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी एकबाल पाशा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वधर्म समभाव व शांतीचा संदेश दिला. हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला. शहरातील सदर बाजार ईदगाह व गांधीनगर ईदगहामध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाज पठाण करून आल्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहनतळाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.