शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

‘इफ्तार’च्या पेंडखजूराचा २० टक्क्यांनी भाव वधारला

By admin | Updated: July 4, 2016 00:27 IST

राजकुमार जोंधळे, लातूर रमजाननिमित्त लातूरच्या बाजारपेठेत पेंडखजुरांची आवक वाढली असून, गतवर्षीपेक्षा यंदा पेंडखजूराचा भाव २० टक्क्यांनी वधारला आहे.

राजकुमार जोंधळे, लातूररमजाननिमित्त लातूरच्या बाजारपेठेत पेंडखजुरांची आवक वाढली असून, गतवर्षीपेक्षा यंदा पेंडखजूराचा भाव २० टक्क्यांनी वधारला आहे. बाजारात २५ पेक्षा अधिक पेंडखजुरांचे विविध प्रकार दाखल झाले आहेत. परदेशातून बाजारात दाखल झालेल्या पेंडखजुरांचीच सध्या चलती असून, ५० ते १२०० रुपये प्रतिकिलोपर्यंतचा भाव आहे. दिवसाकाठी जवळपास २५ क्विंटलची उलाढाल होत आहे. परदेशी पेंडखजूर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे देशी पेंडखजुराला अधिक मागणी आहे. रमजान महिन्यात इफ्तारसाठी लागणारे विविध प्रकारचे पेंडखजूर लातूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, लिबिया,अरबस्तान आदीं राष्ट्रातून या पेंडखजुरांच्या विविध जातींची आवक झाली आहे. परेदशातून आलेल्या पेंडखजुरांचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे देशी पेंडखजुरांना नागरिकांची मागणी जास्त आहे. सध्याला बाजारात २५ पेक्षा अधिक प्रकार बाजारात उपलब्ध असल्याचे व्यापारी जमिलनाना शेख यांनी सांगितले. इफ्तारसाठी प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या पेंडखजुरांचे दर ५० रुपयांपासून सुरु होत असून ते तब्बल १५०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो आहेत. ब्लॉक आय, किमिया, जबरी आदीं जातींचे पेंडखजूर हे १४० ते १८० रुपये प्रतिकिलोच्या भावात विकले जात आहेत. तर इराणी पेंडखजूर ७० ते ८० रुपये किलो आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी पेंडखजुरांचे भाव वधारले आहेत.रमजान महिन्यात या पेंडखजुरांची प्रतिदिन १५ टनापर्यंत विक्री होते. एकट्या लातूर शहरात दररोज ३ टनांपेक्षा अधिक पेंडखजुराची विक्री होत असल्याचे व्यापारी अब्बास शेख यांनी सांगितले. विशेष म्हणजे, देशी पेंडखजुरांना सर्वसामान्यांतून अधिक मागणी आहे. परदेशी पेंडखजुरांचा भाव हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. किमान २५० रुपये ते १५०० हजारांपर्यंत प्रतिकिलो भाव असल्यामुळे हे सर्वसामन्यांना खाणे शक्य नाही. बाजारात दाखल होणाऱ्या जातीमध्ये इराण, इराक, लिबिया, अरबस्तानातून आलेल्या पेंडखजुराला ठराविक ग्राहकांची मागणी असते.