शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालना स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:45 IST

जालना स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर हे सुंदर शहर बनवून मराठवाड्यातील एक आदर्श शहर करण्याकरिता शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिकांचे सहकार्य घेऊन आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. जालना स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले.शहरात नागरिकांनी सुचविलेल्या विकासाच्या सर्व सूचना स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याकरीता शहरातील समस्या, अडीअडचणी जाणून घेणेसाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.यावेळी रितेश मिश्रा, किशोर अग्रवाल, अर्जुन गेही, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, पुसाराम मुंदडा, अविनाश देशपांडे यांच्यासह शहरातील व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.यावेळी खा. दानवे म्हणाले, शहरातील अंडर ग्राऊंड ड्रेनेज करिता ७० कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी १३८ कोटी, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४५ कोटी, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान सुशोभीकरणासाठी ११ कोटी व पर्यटन अंतर्गत नागेवाडी येथील बुद्ध विहार व शिवाजी पुतळा येथील गणेश भवन या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांसाठी ३ कोटी तसेच ड्रायपोर्ट विकास कामांकरिता शेकडो कोटी निधी आपण आणलेला आहे. यापुढेही शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही व जालना शहर स्मार्ट सिटी म्हणून बनवण्याचा प्रत्यन राहील , असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित नागरिकांनी शहरातील विविध विकास कामांच्या मागण्या खा.दानवे यांच्याकडे मांडल्या.१६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन देऊन त्या पूर्ण करण्याकरीता स्वत: पाठपुरावा करू ,असे आश्वासन दानवे यांनी दिले.यावेळी बंडू मिश्रीकोटकर, सतीश पंच, हस्तीमल बंब, सुखदेव बजाज, एस.व्ही.देशपांडे, संजय मुथा, विनीत साहनी, अभय नानावटी, संजय अग्रवाल, समीर अग्रवाल, अभय करवा, प्राचार्य जवाहर काबरा, अतुल लड्डा, पुरूषोत्तम मोतीवाला, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.अंबेकर, अ‍ॅड. किशोर राऊत, हेमंत ठक्कर, भावेश पटेल, सुदेश सकलेचा, अशोक पांगारकर, बन्सीधर आटोळे, मसूद कुरेशी आदींची उपस्थिती होती.