शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड

By | Updated: December 4, 2020 04:09 IST

औरंगाबाद : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबादेतील राज्य कार्यालयावर ...

औरंगाबाद : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबादेतील राज्य कार्यालयावर धाड टाकली. पथकाने सुमारे अडीच तास कार्यालयाची झडती घेतली. त्यानंतर दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी व आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे जप्त करून पथक परतले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे राज्य कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन गुरुवारी सकाळी १० वाजता छापा टाकला. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना पथकातील अधिकारी ईश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इरफान मिली आणि कलीम यांच्याकडून अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. उच्चशिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कोठून येतो? संस्थेचे देणगीदार कोण आहेत? आणि या कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते, यासह अन्य मुद्द्यांवर चौकशी केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबुक, बँक स्टेटमेंट आदी कागदपत्रे, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी केली. पंचनाम्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कलीम यांना सोडून दिले.

======

चौकट

कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पीएफआय कार्यालयावर धाड टाकण्यासाठी येताना सोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणले होते. अचानक ईडीची धाड पडल्याचे कळताच कार्यालयाबाहेर पीएफआय समर्थकांनी गर्दी केली होती.

============

कार्यालय ते रोशनगेट काढला मोर्चा

पथक गेल्यावर ईडीने क्लीन चिट दिल्याचा दावा पीएफआयचे पदाधिकारी कलीम यांनी केला. यानंतर पीएफआयचे पदाधिकारी आणि समर्थकांनी जुना बायजीपुरा ते रोशनगेट असा मोर्चा काढला.

====

कोट

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाहून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धाड टाकली. आम्ही हाथरस प्रकरण, दिल्ली दंगल आणि एनआरसीविरुद्ध जाहीर आंदोलन पुकारल्याने आमचा आवाज बंद करण्यासाठी ईडीचा वापर सरकार करीत आहे.

-इरफान मिली, जिल्हाध्यक्ष, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, औरंगाबाद