शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आडूळच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:31 IST

आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राम शिनगारे/ अंकुश वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील आडूळ येथील विनाअनुदानित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विद्यार्थ्यांकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५ ते १० हजार रुपये घेण्यात आले आहेत. या पैशाची पावतीही विद्यार्थ्यांना दिलेली नाही. पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात येत नसल्याचेही समोर आले आहे.आडूळ येथे बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत ईश्वरसिंह कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकरण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने के लेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या महाविद्यालयात गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांच्याकडून ५ हजार रुपये, शेजारील गावातील विद्यार्थ्यांकडून ६ ते ७ हजार रुपये आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकडून १० हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याची तक्रार अखिल भारतीय मीणा महासभा संघटनेतर्फे विद्यापीठाकडे ४ जुलै रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये विद्यार्थ्यांकडून ५ हजार रुपये शुल्क घेण्यात येत असल्याचे कॅमेºयात कैद झाले. विशेष म्हणजे यात प्रवेशासाठीची कागदपत्रे आणि पैसे दस्तुरखुद्द प्रभारी प्राचार्यच घेत असल्याचे दिसून आले. प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पाच हजार रुपये घेताना दिसतात. पैसे घेतल्यानंतर त्याची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही. एका विद्यार्थ्याने परीक्षा शुल्क कमी करण्याची विनंती केली. तेव्हा प्राचार्य सांगतात, ६ ते ७ हजार रुपये फी ही बालवाडीतील प्रवेशासाठी घेतली जाते. हे तर उच्चशिक्षण देणारे महाविद्यालय आहे. पाच हजार रुपयांच्या फीमध्ये एकही रुपया कमी होणार नाही. यानंतर हा विद्यार्थी हिरमुसल्या तोंडाने बाहेर पडतो. प्राचार्य अ‍ॅडमिशनचे अर्ज तपासण्याच्या कामात व्यस्त होतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी थेट प्राचार्यांनाच बसावे लागते. या महाविद्यालयात लिपिकसुद्धा नसल्याचे दिसून येत आहे.प्रवेश अर्ज भरा अन् परीक्षेला याया महाविद्यालयात थेट औरंगाबाद, ठाणे, पुणेपासून ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. एकदा प्रवेश घेतला की थेट परीक्षेला येण्याची मुभा महाविद्यालयात मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे महाविद्यालयात ना तास होतात ना प्राध्यापक आहेत. जे प्राचार्य विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. तेसुद्धा प्रभारी असून, त्यांचीही पात्रता शंकास्पद आहे. याचवेळी परीक्षेत १०० टक्के कॉपी करण्याची हमी मिळत असल्यामुळे कागदोपत्री सर्व सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचेही स्पष्ट झाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ