शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नावालाच उरली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा

By admin | Updated: June 25, 2014 01:29 IST

औरंगाबाद : एकीकडे गुन्हे शाखा, तसेच ‘डीबी’च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा दर १५ दिवसाला कामाचा आढावा घेतला जातो.

औरंगाबाद : एकीकडे गुन्हे शाखा, तसेच ‘डीबी’च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा दर १५ दिवसाला कामाचा आढावा घेतला जातो. जे पथक कामगिरीत नापास ठरले त्यांना तंबी देऊन पुन्हा कामाला लावले जाते. मात्र, गुन्हे शाखेच्या कामगिरीकडे पोलीस आयुक्तांचे दुर्लक्ष का, हा प्रश्न अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. दर महिन्याच्या १६ तारखेला सर्व ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामाचा पोलीस आयुक्त एका बैठकीद्वारे आढावा घेतात. गुन्हे शाखेत कार्यरत सर्व पथकांचाही १५ दिवसाला आढावा घेतला जातो. जे पथक गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये कमकुवत असेल, त्या पथकाची आयुक्तांमार्फत चांगलीच झाडाझडती घेतली जाते. जे जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल करतील, ते गुन्हे अथवा डीबीमध्ये काम करतील. जे अकार्यक्षम असतील, त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत:हून जागा खाली कराव्यात, असे तोंडी आदेश आयुक्तांचे आहेत. त्यामुळे गुन्हे शाखा तसेच ठाण्यांमध्ये कार्यरत डीबीचे कर्मचारी झपाटून कामाला लागले आहेत.दुसरीकडे आयुक्तालयात गेल्या तीन- साडेतीन वर्षांपासून स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी गतवर्षाच्या तुलनेने जवळपास १ टक्कादेखील नाही. गेल्या वर्षभरात भूखंड माफिये, बनावट कंपन्या, फायनान्स कंपन्या, मल्टीट्रेड मार्केटिंग, टॉवर उभारल्यास लाखो रुपये मिळतील अशा जाहिराती देऊन केली जाणारी फसवणूक, असे विविध ३१ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून दाखल झाले होते. यातील व्हाईट कॉलर भूखंड माफिये, तसेच अन्य आरोपींना गजाआड करण्याची हिंमतही आर्थिक गुन्हे शाखेने दाखविली होती; पण यंदा ६ महिन्यांत अवघे ४ गुन्हे या शाखेने दाखल केलेले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचा प्रवास का मंदावला, याबाबत मात्र आयुक्तालयात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. या शाखेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे शाखेच्या कामगिरीबाबत चर्चा केली असता, आतापर्यंत दाखल गुन्ह्यांत न्यायालयाकडे दोषारोपपत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे, एवढेच उत्तर मिळते.या शाखेत एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक, २ महिला कर्मचारी व ६-७ पोलीस कर्मचारी, १ स्वतंत्र गाडी, असा सारा फौजफाटा कार्यरत आहे. महिनाभरापूर्वी या शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर मधुकर सावंत हे निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. सध्या ते पोलीस भरतीमध्ये व्यस्त आहेत.