शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:08 IST

नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत जगविलेल्या कापसाच्या पिकास वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतकºयांना लागली आहे. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत जगविलेल्या कापसाच्या पिकास वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतकºयांना लागली आहे. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.मानवत तालुक्यात कापसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी आर्थिक भार सहन करीत कापसाची लागवड केली. परंतु, लागवडीनंतर पावसाने दोन महिने पाठ फिरवली. अशा स्थितीमध्ये उपलब्ध पाण्यावर कापूस जगविला. पीक हातात येण्याअगोदर गुलाबी बोंड अळीने पिकावर हल्ला केल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यातच परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकºयांच्या हाती एकरी ४ ते ५ क्विंटल कापूस पडला. बहुतांश शेतकºयांची कापसाची वेचणी शिल्लक आहे. कापूस उत्पादक शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. मजुरीचा दर सव्वाशे रुपयांचा २०० रुपयांवर जावून पोहचला आहे. तर कापूस वेचणीसाठी ७ ते ८ रुपये किलो दर द्यावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजुरीसोबतच वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. कापूस निघाल्यानंतरही बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकºयांची कोंडी झाली आहे. मजुरी, उत्पादन खर्च लक्षात घेता हाती कमी रक्कम पडत आहे. त्यामुळे आर्थिक गणिते कोलमडले आहेत.