शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी सुलभ पीककर्ज

By admin | Updated: June 15, 2017 00:15 IST

नांदेड: खरीप हंगामासाठी दुष्काळग्रस्त असलेल्या १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने सुलभ पीककर्ज अभियान सुरु केले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: खरीप हंगामासाठी दुष्काळग्रस्त असलेल्या १८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने सुलभ पीककर्ज अभियान सुरु केले असून ३० जुलैपर्यंत या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५२० कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी तालुका आणि गावस्तरावर सुलभ पीककर्ज अभियानाची समिती गठीत करण्यात आली आहे़ खरीप हंगाम २०१७ साठी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्याची शासनाने घोषणा केली आहे़ या हंगामासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत ५४ हजार २२० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यात नांदेड जिल्ह्यातही १ हजार ५२० कोटी रुपये पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे़ शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुलभरीतीने व्हावा यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे़ त्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीत तहसीलदार हे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बी़एल़बी़सी. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापक, निरीक्षक हे सदस्य राहणार आहेत़ याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यंत्रणेला निर्देश दिले आहेत़ या अभियानाच्या आढावा मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडचणींची गाव आणि तालुकास्तरावरच सोडवणूक केली जाणार आहे़ त्यासाठी प्रत्येक आठवड्यात तालुका समन्वय समितीने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज करण्यात येणार आहे़ मदत केंद्राच्या ठिकाणी पात्र लाभार्थी, शेतकरी यांना तलाठ्याकडून सातबारा, आठ-अ उतारा, बोझा फेरफार नोंदी व आवश्यक दस्तऐवज पुरवावे लागणार आहेत़ संबंधित मदत केंद्रावर गटसचिव व बँक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक आणि तालुका पातळीवर त्यासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत़ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली़