जालना : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. या गगनभेदी घोषणांनी थाटात व उत्साही वातावरणात गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला. जुना जालना भागातील मंडळांनी वेळेच्या आता विसर्जन मिरवणूक पूर्ण केली, तर नवीन जालना भागात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. रविवारी दुपारी बारा वाजेनंतर श्रींच्या विसर्जनाला प्रारंभ झाला. बहुतांश मंडळांनी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विसर्जन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मोती तलावात शेकडो गणेश मंडळ तसेच अनेक कुटुंबियांनी आनंदात बाप्पाला निरोप दिला. सायंकाळनंतर मोतीतलाव परिसर गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.नवीन जालना भागातील अनेक गणेश मंडळे आकर्षक देखाव्यासह सहभागी झाले होते. यात राम मंदिर, ज्योती गणेश मंडळाचा देखावा, अयप्पा स्वामी मंदिरसह लहान मोठे देखावे भाविकांचे मिरवणुकीस सहभागी झाले होते. मानाच गणपती मिरवणूक वेळेत सुरु झाली. मात्र, सोमवारी पहाट अनेक मंडळांनी सकाळी गणपती विसर्जन केले. जुना जालन्यातील चमनच्या राजा गणेश मंडळाने दुपारीच मिरवणुकीस सुरूवात केली. या मंडळाने भद्रा मारोतीचा देखावा विसर्जन मिरवणुकीत ठेवला होता. प्रतिष्ठा गणेश मंडळाने पुष्पवृष्टी केली. मोती तलावात रविवारी दिवसभर व सोमवारी पहाटेपर्यंत घरगुती व गणेश मंडळ अशा एकूण २४ हजारांवर मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. सोमवारी सकाळी सहा वाजता वीरशैव कैकय्या गणेश मंडळ रामनगर येथील गणेश मूर्तीचे शेवटचे विसर्जन झाले. भव्यदिव्य व आकराने मोठ्या शहरातील विविध गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
पुढच्या वर्षी लवकर या...
By admin | Updated: September 29, 2015 00:43 IST