शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

ई-मोबिलिटी तंत्रज्ञान अवजड वाहनात लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:39 IST

अवजड वाहने जसे की, कंटेनर, हायवा ट्रक्स, प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसमध्ये ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान भविष्यात वापरणे शक्य होणार आहे.

औरंगाबाद : अवजड वाहने जसे की, कंटेनर, हायवा ट्रक्स, प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसमध्ये ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान भविष्यात वापरणे शक्य होणार आहे. यासाठी भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांकडे प्रस्ताव देण्यात येत आहेत, लवकरच जर्मन टेक्नॉलॉजी अवजड वाहनात वापरून भयावह अपघात रोखणे शक्य होईल, असा दावा सी-मोर आटोमोटिव्हचे बिझनेस हेड डॉ. माथियाज् झोबेल यांनी बुधवारी केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्रेगर माटेनर, जॉइंट व्हेंचर एक्सपर्ट ग्लोबचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती. 

दोन दिवसांपूर्वी करमाड येथे कंटेनरचे टायर फु टून भयावह अपघात झाला. असे अपघात होऊ नयेत, यासाठी ई-मोबिलिटीचा अवजड वाहन उत्पादक कंपन्या वापर करून शकतील काय, यावर देशपांडे म्हणाले, भारतीय अवजड वाहन उत्पादक कंपन्यांशी याबाबत बोलणे सुरू आहे. हे तंत्रज्ञान अवजड वाहनात वापरल्यास टायरमधील हवेचा दाब, इंजिनमधील बिघाड, रस्त्यांवरील खड्डे, समोरून व मागून येणार्‍या वाहनांशी संभाव्य धडक होण्याचे संकेत या तंत्रज्ञानातून चालकाला मिळू शकतील. त्या अलर्टकडे जरी चालकाचे दुर्लक्ष झाले तरी अचानक ब्रेक लागून अपघात टाळणे शक्य होईल.

बुधवारी वॉशिंग्टनमध्ये ड्रायव्हरलेस कारचा अपघात होऊन एक महिला दगावली. यावर डॉ. झोबेल म्हणाले, ती घटना दुर्दैवी आहे; परंतु तेथील परिस्थितीवरून त्या अपघाताचे विश्लेषण करणे शक्य होईल. दरम्यान, जर्मन कौन्सिलिटचे राजदूत डॉ. उर्गेन मोरहार्ड यांच्या हस्ते ईसी-मोबिलिटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी मुकुंद भोगले, डॉ.कवडे, संजीव तांबोळकर, हर्ष जाजू, उमेश दाशरथी, मोहिनी केळकर, प्रा.मुनीष शर्मा आदींची उपस्थिती होती.

भारतात ड्रायव्हरलेस कारला उशीरभारतीय रस्त्यांवर ड्रायव्हरलेस कार धावण्यास मोठा उशीर आहे. ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान सध्या आशिया, युरोप, अमेरिकेत वापरले जात आहे. भारतामध्ये ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी स्थानिक कार उत्पादक कंपन्यांशी बोलणे सुरू आहे; मात्र अद्याप कुणी पुढे आलेले नाही. सध्या फ्रंट अ‍ॅण्ड बॅक पार्किंग कॅमेर्‍याची सुविधा येथील कार उत्पादक देत आहेत. गुगल नेव्हिगेशन अलीकडच्या काही उत्पादनांमध्ये मिळते आहे. औरंगाबाद ते पुणे मार्गे बंगळुरूपर्यंत रोडचे रायडर मॅपिंग तयार करण्यात आले आहे. त्या रोडवर जे बदल होतील, ते सॉफ्टवेअरमार्फत अपडेट होतील, असे यावेळी सांगण्यात आले.