शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंगने नवीन क्रांती होणार

By admin | Updated: March 6, 2017 00:44 IST

ज्ाालना : रोटरी क्लबने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १८५ शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने उभारलेल्या ई-लर्निंगमुळे नवीन क्रांती होईल,

ज्ाालना : रोटरी क्लबने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १८५ शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने उभारलेल्या ई-लर्निंगमुळे नवीन क्रांती होईल, असा विश्वास रोटरी क्लब आयोजित ई-लर्निंग लोकार्पण सोहळ्यात सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला. येथील बीज शीतलच्या सभागृहात रविवारी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कमलनयन बजाजचे अध्यक्ष सी.पी.त्रिपाठी, उद्योजक सुनील रायठठ्ठा, डायटचे प्राचार्य ए. बी. भटकर, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी, प्रोजेक्टर चेअरमन नितीन काबरा, आदेश मंत्री, सचिव वीरेंद्र देशपांडे, उद्योजक दिनेश राठी आदींची उपस्थिती होती. बजाज अ‍ॅटोचे सल्लागार तथा कमलनयन बजाज हॉस्पिटलचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी म्हणाले, सामाजिक उत्तरदायित्वातून रोटरी क्लबने केलेले ई-लर्निंगचे काम कौतुकास्पद आहे. जालना हे सीड आणि स्टिलसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे सामाजिक उपक्रमांचा पाया भक्कम आहे. ‘श्रद्धावान लभते विद्या’ या गीतेतील श्लोकाचा आधार घेऊन त्यांनी श्रद्धेने कार्य अथवा शिक्षण घेतल्यास त्यात निश्चित यश मिळते असे सांगून ई-लर्निंगमुळे शिक्षकांची संख्या कमी होईल, अशी भीती वाटण्याचे शिक्षकांना काही एक कारण नाही. बजाज समुहाकडून राबविण्यात असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. औरंगाबाद- जालना अंतर फारसे नाही. त्यामुळे भविष्यात या समुहाकडून जालनासाठी सामाजिक मदत होऊ शकेल, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला.उद्योजक रायठठ्ठा म्हणाले, या रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व प्रथम जामवाडीपासून जवळ असलेल्या फुलेनगरातील शाळेला एक संगणक दिला. त्या आठवणीला उजाळा देत, रोटरी क्लबचे ई-लर्निंगचे काम विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा देणारे असल्याचे नमूद केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वप्न बघण्याचे शिकविले पाहिजे. मनी बाळगलेले स्वप्नच यशाला गवसणी घालण्यासाठी उर्जा देते. शिक्षकांनी दाखविलेले स्वप्नच मला पुढे नेत असल्याचे रायठठ्ठा यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. क्लबचे सचिव वीरेंद्र देशपांडे यांनी सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. डायटचे प्राचार्य ए.बी.भटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी यांनी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणार सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. १८५ शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू केले आहे. अद्यापही ३०० शाळांनी ई-लर्निंग सुविधा करून द्यावी म्हणून अर्ज केल्याचे सांगून या उपक्रमासाठी सर्वांचेच सहकार्य लाभल्याचे सांगितले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रोजेक्ट चेअरमन आदेश मंत्री यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)